Ad will apear here
Next
इतिहास जिवंत होणार…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत पहायला मिळणार ‘चवदार तळे सत्याग्रह’

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील महत्त्वाचा लढा म्हणजे महाडचा सत्याग्रह. रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळ्यावर अस्पृश्यांना पाणी घेता यावं यासाठी बाबासाहेबांनी सत्याग्रह केला. हा लढा फक्त पाण्यापुरता मर्यादित नव्हता तर ती सुरुवात होती मानवी मुलभूत हक्कांच्या चळवळीची. या घटनेनंतर समतेचे वारे देशाच्या कानाकोपऱ्यातून वाहू लागले. अंगावर रोमांच उभा करणारा हा ऐतिहासिक प्रसंग स्टार प्रवाह वाहिनीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे सहा डिसेंबर रोजी  बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनीच या खास भागाचं शूटिंग करण्यात आले.


या विशेष भागाच्या चित्रीकरणाविषयी सांगताना बाबासाहेबांची भूमिका साकारणारे सागर देशमुख म्हणाले, ‘परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिनी आम्ही महाड सत्याग्रहाचे चित्रीकरण केले. हा एक विलक्षण योगायोग आहे. महामानवाला ह्यापेक्षा अधिक चांगली श्रद्धांजली असू शकत नाही. त्यांच्या महान कार्याची आठवण होऊन,  त्यांनी केलेला बदल ऐकून, वाचून डोळ्यात पाणी येतं आणि त्यांच्यासारख्या महामानवापुढे नतमस्तक व्हायला होतं. माझ्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर मला त्यांची भूमिका साकारायला मिळणं, हे मी माझं भाग्य समजतो आणि हेही मान्य करतो की ती साकारणं खूप अवघड काम आहे. त्यांचे विचार, त्यांची दूरदृष्टी मला माणूस म्हणून चकित करून जाते. आत्तापर्यंत आपण बाबासाहेब घरी कसे होते आणि त्यांची शिक्षणाची तळमळ काय होती हे बघितले. आता आपण मुख्य ऐतिहासिक घडामोडींकडे वळणार आहोत. आता बाबासाहेबांची राजकीय कारकिर्द प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. त्यासाठी न चुकता डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री नऊ वाजता स्टार प्रवाहवर जरूर पाहा.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZWDCH
Similar Posts
अमेरिकन सरोदवादक केन झुकरमन यांनी उलगडली कारकीर्द पुणे : गिटार वाजवत असताना आणि भारतीय शास्त्रीय संगीताचा गंधही नसताना सरोदने घातलेली भुरळ, प्रथम सतार शिकण्यास केलेली सुरुवात आणि पुन्हा सरोदच्या शिक्षणाकडे वळलेले पाय आणि सरोदलाच वाहून घेण्याचा मनाने घेतलेला निर्णय… अमेरिकेतील प्रख्यात सरोदवादक केन झुकरमन यांनी आपला प्रवास ‘सवाई’च्या ‘अंतरंग’ कार्यक्रमात उलगडला
पुण्याच्या ओंकार मोदगीचा लघुपट एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुणे : पुण्यातील पटकथालेखक व दिग्दर्शक ओंकार मोदगी याच्या ‘डोगमा’ या लघुचित्रपटाची लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या एशियन फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झाली आहे. गुरुवारी, १२ डिसेंबर रोजी लॉस एंजिलिसमध्ये हा लघुचित्रपट दाखवला जाणार आहे.
६५व्या वर्षी मॅरेथॉन जिंकणाऱ्या लता भगवान करेंची संघर्षगाथा चित्रपट रूपात पुणे : एखादी सामान्य व्यक्तीही रोजच्या जगण्याचा संघर्ष करत असताना एखादी अफाट कामगिरी करून जाते आणि सारी दुनिया थक्क होते. अशीच एक प्रकाशझोतात आलेली व्यक्ती म्हणजे ६५ व्या वर्षी अनवाणी पायाने धावून बारामतीतील शरद मॅरेथॉन जिंकणाऱ्या लता करे. त्यांच्या आयुष्यावर ‘लता भगवान करे - एक संघर्षगाथा’ हा चित्रपट
‘आई कुठे काय करते’ : आईच्या भावविश्वाचा वेध घेणारी नवी मालिका पुणे : व्यापता न येणारं अस्तित्व आणि मोजता न येणारं प्रेम म्हणजे आई. तिच्या निर्व्याज प्रेमाची परतफेड करणं अशक्य आहे. आपल्याआधी तिचा दिवस सुरू होतो. सर्वांच्या आवडी-निवडी, कामाच्या वेळा, थोरामोठ्यांची काळजी आणि घर जपताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे विसरते. तसं पाहिलं तर गृहिणीच्या कामाचं आणि तिच्या त्यागाचं कोणतंही मोल नसतं

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language